दीपोत्सव : परंपरा जपण्यासाठी एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी विकत आहेत पणत्या

लालसगाव : सचिन रोकडे यांचेकडुन पणत्या खरेदी करतांना निमगाव येथील दरेकर कुटुंबियांच्या गृहीणी. ( छाया: राकेश बोरा)
लालसगाव : सचिन रोकडे यांचेकडुन पणत्या खरेदी करतांना निमगाव येथील दरेकर कुटुंबियांच्या गृहीणी. ( छाया: राकेश बोरा)

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये बारा बलुतेदारांची वर्णव्यवस्था असायची. अत्याधुनिक जगात ही व्यवस्था कालबाह्य वाटत असली तरी त्यापैकी बऱ्याच जणांना अजूनही या वर्णव्यवस्थेचा अभिमान आहे. काळानुरुप कात टाकत एक एक समाज आधुनिकतेकडे वाटचाल करत चालला आहे. मात्र, त्यातही समाजव्यवस्थेचा अभिमान बाळगत कुंभार समाजाचे व एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी सचिन रोकडे हे आधुनिकत जगात परंपरेचा वारसा मनापासून जपत आहे. दीपोत्सवात कितीही लाईटींग आणि शोभेचे दीवे लागले तरी मात्र लक्ष्मीपूजनाला मातीच्या पणत्यांना विशेष मान असल्याने कुंभाराकडून या पणत्या विकत घेण्यासाठी गृहीणींची लगबग दिसून येत आहे.

दिवाळी सणाचा झगमगाट आणि लखलखत्या दिव्यांचा सण हा मातीचे दिवे बनवण्याऱ्या कुंभार समाजासाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे. गावा गावांमध्ये गॅस एजन्सी सुरू झाल्यावर मातीच्या चुली कमी होत जाण्याचा वेग वाढला, प्लास्टिकच्या भांड्यांनी मातीचे माठ, मडके अधिक निरर्थक ठरवले. पारंपारिक व्यवसायावर अवलंबून असणारे मोठ्या प्रमाणात सुशिक्षित होत गेले. मातीची मडकी, मातीचे भांडी तयार करणे, तिला वाळविणे, नंतर भाजणे किंवा विटा बनवणे वाळवणे, भाजणे ही कामे पावसाळा सोडून इतर काळात करावी लागतात. त्यामुळे सहा महिन्यातच वर्षभराची कामे करून मिळवलेल्या संचितावर (उत्पन्न) वर्षभर भागवावे लागत असल्याने काटकसर करून योग्य तो खर्च करुन कुंभार समाज आली ती परिस्थिती पचवून बदललेल्या परिस्थितीला सामोरे जात आहे.

पारंपारिक व्यवसाय करताना येणाऱ्या अनेक अडचणी आणि उत्पादित केलेली मातीची भांडी त्यांना मिळणारा मोबदला तसेच व्यवसायातील मागासलेपणा, शासनाकडून कोणतीही सवलत न मिळणे अशा अनेक समस्या या कुंभार समाजासमोर आजही निर्माण झालेल्या दिसून येतात. तरीही लासलगाव बाजार पेठेत निमगाव, वेळापूर या ठिकाणांहून पणत्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. वेळापूर येथील कै. पांडूरंग रोकडे हयात असतांना पणत्या विकण्यासाठी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, घरोघरी पणत्या विक्रीसाठी त्याकाळी प्राण्यांची मदत घेत असत. आता त्यांचे नातू एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी सचिन रोकडे हे आधुनिकत जगात मोटारसायकलवर घरोघरी फिरून पणत्या विकत आहेत. अभिमानाची गोष्ट अशी की, आता सर्व समाज सुशिक्षित आणि उच्चभ्रू झाला असतांना सुद्धा फक्त समाजाप्रती असलेले दायीत्व, आजोबांचा वारसा पुढे चालवायचा या भावनेतून ते पणत्या विकत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे लासलगाव, वेळापुर, निमगाव, ब्राह्मणगाव परिसरात कौतुक होत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news