पावसानं पिकं सडलीत, दिवाळी कशी साजरी करू? शेतकऱ्यांसमोर संकट | पुढारी

पावसानं पिकं सडलीत, दिवाळी कशी साजरी करू? शेतकऱ्यांसमोर संकट

बीड; पुढारी वृत्तसेवा : परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. कापणीला आलेली पिके पावसामुळे सडली आहेत. सरकार मात्र फक्त घोषणा करत आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला, दिवाळी कशी साजरी करू, अशा भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे .गेले पंधरा दिवस झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने शेतातील काढणीला आलेले सोयाबीन सडले आहे. बाजारातही त्याचे भाव पडले आहेत. अनेक ठिकाणी कापून ठेवलेली पिके मातीमोल झाली आहेत. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. प्रशासकीय यंत्रणा मात्र कोणत्याही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीचा पंचनामा करत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

सध्या सगळीकडे दिवाळी सण साजरा होत आहे. परंतु आमच्या लेकरांनी खावं काय? दिवाळी सण साजरा करायला पैसा नाही, शेतात आणि डोळ्यात पाणी आहे. शासनाने मदत करायला हवी होती.
– सुनिल नाटकर, शेतकरी, राक्षसभुवन

हेही वाचा :

Back to top button