Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत रियल इस्टेट क्षेत्राला मिळणार बूस्ट

रिअल इस्टेट,www.pudhari.news
रिअल इस्टेट,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या सर्वच क्षेत्रांवर जागतिक मंदीचे सावट आहे. मात्र, असे असतानाही रियल इस्टेट क्षेत्रावर त्याचा कुठलाही परिणाम दिसून येणार नाही. विशेषत: दिवाळी काळात रियल इस्टेट क्षेत्राला बूस्ट मिळणार असून, बांधकाम व्यावसायिकांनीही ग्राहकांची गरज ओळखून, दिवाळीनिमित्त गृहप्रकल्पांमध्ये विविध योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक ग्राहक आपल्या हक्काच्या घरात प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांश साइटवर ग्राहकांच्या व्हिजिट वाढल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांनीही बुकिंगसाठी केवळ 10 टक्के रकमेसह विविध बँकांच्या योजनांचे आकर्षणही दाखविले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही संधी साधून अनेक बँकांनीदेखील पुढाकार घेत, गृहकर्ज लवकरात लवकर मंजूर करून देण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर दिवाळीच्या तोंडावर बुकिंग केल्यास ठरावीक रकमेचीही सूट दिली जात आहे. मंदीच्या सावटामुळे रियल इस्टेटच्या खरेदीवर सावट होते. मात्र, आकर्षक योजनांमुळे रियल इस्टेटच्या खरेदीतही यंदा जोर दिसत आहे. दरम्यान, सध्या शहराच्या चहुबाजूने तयार प्रकल्प असून, या ठिकाणी सध्या जोरदार बुकिंग सुरू आहे.

अनेकांनी दसर्‍याच्या मुहूर्तावर बुकिंग केले असून, दिवाळीच्या मुहूर्तावर गृहप्रवेशाची योजना आखल्याचे दिसून येत आहे. शहरातील मोठ्या प्रकल्पांमध्ये स्विमिंग टँक, क्लब हाउस, पर्किंग अशा अनेक सुविधा देऊ केल्या आहेत. काही प्रकल्पांमध्ये तर किचनच्या ट्रॉलदेखील फ्री देण्यात येत आहेत. काही प्रकल्पांमध्ये फर्निचर देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकही गृहखरेदी करताना अत्यंत सकारात्मकता दर्शवित असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news