धुळे : बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा | पुढारी

धुळे : बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

धुळे : पुढारी वृत्तसेवा 
बालिकेवरील अत्याचारप्रकरणी सत्र न्यायधिश यांनी एकास दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
साक्री येथील शाळेतील खुल्या बाथरुममध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत असणारी विद्यार्थीनी लघुशंकेसाठी गेली असता रंगकाम करणारा अमजतशहा नासिर शहा फकीर याने तिला एकटे गाठून तिच्यावर अत्याचार केला. ही बाब निदर्शनास आल्याने  पिडीतेच्या नातेवाईकांनी तत्काळ तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरोधात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश सोनवणे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडितेसह वैद्यकीय अधिकारी, पंच आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या खटल्यात विशेष सरकारी वकील निलेश कलाल यांनी युक्तिवाद केला. यात पीडितेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार न्यायाधीश वाय जी देशमुख यांनी बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी अमजदशहा फकीर याला दहा वर्षे सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच दहा वर्षे सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्र भोगाव्या लागणार आहेत.

हेही वाचा:

Back to top button