IND vs PAK : पाकचा स्टार खेळाडू जखमी, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी रुग्णालयात दाखल

IND vs PAK : पाकचा स्टार खेळाडू जखमी, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी रुग्णालयात दाखल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs PAK T20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपमधील भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा स्टार खेळाडू शान मसूद सराव सत्रादरम्यान जखमी झाल्याचे समोर आले आहे. त्याला स्कॅनसाठी रुग्णालयातही न्यावे लागले आहे. मसूद हा पाकिस्तानच्या 15 सदस्यीय संघाचा भाग आहे आणि तो शुक्रवारी मेलबर्नमध्ये नेटमध्ये सराव करत होता. यादरम्यान संघाचा अष्टपैलू मोहम्मद नवाजने फेकलेला चेंडू लागल्याने मसूद जखमी झाला. (IND vs PAK t20 world cup pakistan cricketer shan masood injured during practice session)

मसूद रुग्णालयात, पाक संघाला धक्का

भारताविरुद्धच्या महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानने सर्व खेळाडूंसाठी सराव सत्राचे आयोजन केले होते. पण हा हंगाम संघासाठी अडचणीचा ठरला. सरावादरम्यान, मसूदला दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. शान मसूदच्या दुखापतीचे गांभीर्य अद्याप समजू शकलेले नाही. पण त्याचे स्कॅनिंग करण्यात येणार असल्याचे समजते आहे.

मसूदने या वर्षीच केले होते पदार्पण

शान मसूदने या वर्षी सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या होम सीरिजमधून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने 12 सामन्यात 24.22 च्या सरासरीने आणि 125 च्या स्ट्राईक रेटने 220 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतकेही झळकली आहेत. अशा परिस्थितीत तो स्पर्धेतून बाहेर पडला तर पाकिस्तानसाठी मोठा धक्का असू शकतो. सराव सत्रादरम्यान मात्र, मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक, फलंदाजी सल्लागार मॅथ्यू हेडन यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानी खेळाडूंनी नेटमध्ये बराच वेळ घालवला. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफने शादाब खानसोबत गोलंदाजी केली. तर फलंदाजांमध्ये कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांनी शॉर्ट बॉलवर फटकेबाजीचा सराव केला. उस्मान कादिरच्या दुखापतीनंतर पाकिस्तानने शेवटच्या क्षणी आपल्या संघात बदल केला. कादिरच्या जागी फखर जमानचा 15 खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला. फखरला यापूर्वी स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले होते. (IND vs PAK t20 world cup pakistan cricketer shan masood injured during practice session)

पाकिस्तानचा संघ :

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद.

स्टँडबाय खेळाडू : उस्मान कादिर, मोहम्मद हारिस, शाहनवाज डहानी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news