पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा : एक हजार रिक्त पदांसाठी आजपासून पदे भरणार | पुढारी

पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा : एक हजार रिक्त पदांसाठी आजपासून पदे भरणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, त्र्यंबक नाका यांच्या संयुक्त विद्यमाने पाचदिवसीय पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून १ हजार ६० रिक्त पदे भरली जाणार असून, ऑफलाइन पद्धतीने १३, तर ऑनलाइन पद्धतीने ५ नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.

मेळाव्याच्या माध्यमातून बिलो एसएससी, एसएससी, एचएससी, ॲप्रेंटिसशिप, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मॅकेनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट मॅनेजमेंट आदी पात्रताधारक सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. बुधवारी (दि. १९) सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ऑफलाइन मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यात नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यांतील आस्थापना सहभागी होणार आहेत, तर वेबकॉम, मोबाइल / दूरध्वनीद्वारे ऑनलाइन पद्धतीने पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड केली जाणार आहे.

अथर्व मोल्डिंग (मशीन ऑपरेटर – 48, अकाउंटंट – 2, एकूण – 50), सतीश इन्जेक्टोप्लास्ट (मशीन ऑपरेटर – 80, एकूण – 80), कोसो इंडिया (आयटीआय टर्नर – 50, एकूण – 50), कॅपरिहान्स इंडिया (आयटीआय पीपीओ व फिटर – 50, एकूण – 50), श्रुती हर्बल रेमेडिस इंडिया (मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह – 50) आदी 5 नामांकित कंपन्यांची तब्बल 280 रिक्त पदे ऑनलाइन मेळाव्यात उपलब्ध असणार आहेत. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी या महारोजगार मेळाव्याच्या ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने मुलाखती देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त अ. ला. तडवी यांनी केले आहे.

मेळाव्यात सहभागी आस्थापना अशा….

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा (पदे – ईपीपी ट्रेनिशिप, एसएससी व वेल्डर, इलेक्ट्रिशियन, फिटर, मॅकेनिक मोटर व्हेईकल, डिझेल मॅकेनिक- 100), डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस (ऑपरेटर – 100), मेडप्लस फार्मासी (कस्टमर सर्व्हिस असोसिएट – 20, फार्मासिस्ट – 10, एकूण – 30), नवभारत फर्टिलायझर (सेल्स ट्रेनी – 31, मार्केट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह – 5, एकूण – 36), रेसेमोसा एनर्जी इंडिया (आयटीआय ट्रेनी इंजिनियर – 20), महिंद्रा सीआयई स्टॅपिंग स्टेशन (ॲप्रेंटिस – 100), बॉश (डिप्लोमा इन ट्रेनी ॲप्रेंटिसशिप – 100), परफेक्ट प्रोटेक्शन सिक्युरिटी & मॅनपाॅवर सर्व्हिसेस (डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह – 50), 9) युनिव्हर्सल टेक सर्व्हिसेस सेल्स ॲण्ड सर्व्हिस (कॉम्प्युटर ऑपरेटर – 1, इलेक्ट्रिशियन – 6, हेल्पर – 2, एकूण – 9), युवाशक्ती फाउंडेशन (आयटीआय ट्रेनी – 50, ट्रेनी इंजिनियर – 50, ट्रेनी ग्रॅज्युएट- 50, एकूण – 150), बाँम्बे इटेलिजेंट्स सिक्युरिटी इंडिया (सुपरवायझर – 5, सिक्युरिटी गार्ड – 50, एकूण- 55), व्हीआयपी इंडस्ट्रीज (एचआर & ॲडमिन-10), एसएमपी ऑओटेक (डिप्लोमा सीएनसी ऑपरेटर-20).

हेही वाचा:

Back to top button