नाशिक : समस्या मार्गी लावण्यासाठी भरीव निधी द्या, डीपीसी’च्या बैठकीत आमदार कांदेंची मागणी

नाशिक : समस्या मार्गी लावण्यासाठी भरीव निधी द्या, डीपीसी’च्या बैठकीत आमदार कांदेंची मागणी

नाशिक, मनमाड : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सुहास कांदे यांनी मतदारसंघातील विविध समस्याकडे पालकमंत्री दादा भुसे यांचे लक्ष वेधले. समस्या मार्गी लावण्यासाठी भरीव निधी देण्याची मागणी यावेळी आमदार कांदे यांनी केली.

नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर दादा भुसे यांनी आज जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलविली होती.  बैठकीत आमदार सुहास कांदे यांनी मनमाड, नांदगावसह मतदारसंघातील विविध समस्याकडे पालकमंत्री दादा भुसे यांचे लक्ष वेधले. यावेळी आमदार कांदे यांनी मतदारसंघात नवीन डीपी बसविण्यात याव्या, डीपीवरील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये, वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबविण्यात यावी, खेड्यापाड्यावरील शाळांवरती सोलार लाईट बसविण्यात यावे अशा विविध मागण्या मांडल्या. शिवाय मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी भरीव निधी देण्याची त्यांनी मागणी केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news