नाशिक : ई-पॉसवरील अंगठ्याच्या समस्येची सोडवणूक | पुढारी

नाशिक : ई-पॉसवरील अंगठ्याच्या समस्येची सोडवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

धान्य वितरणावेळी ई-पॉस मशीनवर लाभार्थ्यांच्या अंगठा घेण्याचा मुद्दा मार्गी लावण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या काळात शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरणावेळी कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशा सूचना केंद्रीय पंचायतराज विभागाचे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केल्या.

ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज फेडरेशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच नवी दिल्लीत ना. पाटील यांची भेट घेतली. या भेटीत पदाधिकाऱ्यांनी रेशन दुकानदारांच्या अडचणी पाटील यांच्यापुढे मांडल्या. त्यावर ना. पाटील यांनी लाभार्थ्यांचा ई-पाॅसवर दोनदा अंगठा घेण्याबाबतचा मुद्दा मार्गी लावला आहे. त्यामुळे सणांच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांना धान्य वितरणात कोणतीही अडचण येऊ नये. तसेच दुकानदारांनी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच काम करावे, अशा सूचना यावेळी पाटील यांनी केल्या. संघटनेचे राज्य अध्यक्ष गणपत डोळसे-पाटील, सचिव बाबूराव म्हमाणे, ठाणे जिल्हाध्यक्ष शंकर सुरोसे, कोकण विभाग अध्यक्ष शांताराम पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे, जयराम मेहेर, योगेश बत्तासे, फारुखभाई शेख, अरुण बागडे, रमेश भोईर, विवेक बेहेरे आदी उपस्थित हाेते.

हेही वाचा:

Back to top button