

नाशिक : कुरापत काढून एकाने १७ वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर दुखापत केल्याची घटना कार्बन नाका येथील आर. के. पॉइंट जवळ घडली. या हल्ल्यात साहिल दीपक तिवडे (रा. श्रमिकनगर) हा युवक जखमी झाला आहे. साहिलच्या फिर्यादीनुसार संशयित मयूर याने मंगळवारी (दि.४) रात्री अकराच्या सुमारास कुरापत काढून चॉपरने वार करून गंभीर दुखापत केली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस तपास करीत आहेत.