नाशिक : 'एनडीएसटी'च्या निवडणुकीचा फड रंगणार | पुढारी

नाशिक : 'एनडीएसटी'च्या निवडणुकीचा फड रंगणार

सिडको : पुढारी वृत्तसेवा

नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स ॲण्ड नॉनटीचिंग एम्प्लॉइ क्रेडिट सोसायटी अर्थात एनडीएसटी निवडणुकीच्या तारखेकडे जिल्ह्यातील तमाम शिक्षक मतदारांचे आणि तिन्ही पॅनलचे लक्ष लागले आहे. निवडणुकीची तारीख जाहीर नसली तरी या निवडणुकीतील तीन पॅनलचे प्रचारप्रमुख आणि उमेदवारांनी आत्तापासूनच शाळाशाळांमध्ये जोरात प्रचार सुरू ठेवला आहे.

राज्यातील पूरस्थिती आणि बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे सहकार विभागाने १५ जुलैला राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एनडीएसटीची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली होती. शासनाने आता निवडणुकीचा मार्ग मोकळा करून दिला आहे. शाळांना दीपावलीच्या सुट्या १७ ऑक्टोबरपासून लागणार आहेत. १५ आक्टोबर (शनिवार) हा शाळेचा या सत्रातला शेवटचा दिवस आहे. तसेच त्या दिवशी वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम शाळेत साजरा करायचा आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालय १४ किंवा १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा दिवाळी सुट्टीनंतर निवडणूक तारखेची घोषणा करेल, अशी चर्चा शिक्षकांमध्ये रंगली आहे. त्यामुळे तीनही पॅनलचे प्रचारप्रमुख, नेते व उमेदवार हे शिक्षक मतदारांच्या भेटी घेत आहेत.

यंदा तिरंगी लढत : जिल्ह्यातील अकरा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची अर्थवाहिनी असलेल्या एनडीएसटीत २१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तीन पॅनलची निर्मिती झाली असून, त्यांनी आपापले उमेदवारही जाहीर केले आहेत. सत्ताधारी महाराष्ट्र राज्य टीडीएफ शिक्षक सेना, मुख्याध्यापक संघ शिक्षकेतर संघटना, आश्रमशाळा संघटना व समविचारी संघटनेद्वारे पुरस्कृत टीडीएफ प्रगती पॅनल तयार करण्यात आलेले आहे. या पॅनलचे नेते माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, कचेश्वर बारसे, संजय चव्हाण, बाळासाहेब सूर्यवंशी, शिवाजीराव निरगुडे, रवींद्र मोरे, इ. के. कांगणे, भाऊसाहेब शिरसाट या नेत्यांनी २१ जागांसाठी २१ उमेदवार जाहीर केले आहेत.

टीडीएफ प्रगती पॅनलचे उमेदवार असे…

नाशिक सर्वसाधारण गटात-निंबा कापडणीस, सचिन पगार, चंद्रकांत सावंत

त्र्यंबक पेठ- प्राचार्य दीपक व्याळीज,

दिंडोरी- विलास जाधव, सटाणा- संजय देसले,

देवळा/कळवण/सुरगाणा-शांताराम देवरे, संजय पाटील,

मालेगाव- संजय वाघ, मंगेश सूर्यवंशी, चांदवड- ज्ञानेश्वर ठाकरे, नांदगाव- अरुण पवार, येवला- गंगाधर पवार,

निफाड-समीर जाधव, सिन्नर-दत्तात्रेय आदिक,

इगतपुरी- बाळासाहेब ढोबळे

महिला प्रतिनिधी- विजया पाटील, भारती पाटील

अनु जाती. जमाती- अशोक बागूल

एनटी – मोहन चकोर, ओबीसी – अनिल देवरे

परिवर्तन पॅनलचे उमेदवार असे …

एनडीएसटी विकास समिती पुरस्कृत माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी परिवर्तन पॅनलचे उमेदवार घोषित केले. यावेळी पॅनलचे नेते श्याम पाटील, के. के. अहिरे, साहेबराव कुटे, एस. बी. देशमुख, डी. यू. अहिरे, पुरुषोत्तम रकिबे, विजय पाटील, भगवान पानपाटील, प्रमोद पाटील हे पॅनलचे नेते आहेत.

नासिक सर्वसाधारण- संग्राम करंजकर, संजय पाटील, सचिन सूर्यवंशी

त्र्यंबक पेठ- शुभांगिनी पवार,

दिंडोरी- लोकेश पाटील, सटाणा- सचिन शेवाळे,

देवळा/कळवण/सुरगाणा- बी. एन. देवरे, जी. टी. पगार

मालेगाव – संजय मगर, प्रकाश भदाणे, चांदवड – सचिन पाटील, नांदगाव – बाळासाहेब भोसले, येवला – बाळासाहेब मोरे, निफाड – शंकर सांगळे, सिन्नर – दत्ता वाघे पाटील, इगतपुरी – प्रशांत आहेर

महिला प्रतिनिधी – अरुणा खैरनार, सविता देशमुख

अनु. जाती. जमाती – उत्तम झिरवाळ

एनटी – गोरख कुणगर, ओबीसी- राजेंद्र लोंढे,

पीडीएफ/ डीसीपीएसचे पॅनल असे…

फिरोज बादशाह, प्रकाश सोनवणे आणि आर. डी. निकम यांच्या नेतृत्वाखालील पीडीएफ/ डीसीपीएस या तिसऱ्या पॅनलतर्फे चांदवड – यु. के. आहेर, येवला – अरुण विभुते, दिंडोरी – सोमनाथ धात्रक, देवळा/कळवण/सुरगाणा – राकेश आहिरे, मालेगाव – सुधीर पाटील, जयेश सावंत, नाशिक – तुषार पगार, हेमंत पाटील, नीलेश ठाकूर, महिला – सीमा देवरे, अनुसूचित जाती/जमाती – स्नेहलता पवार आणि इतर मागास प्रवर्गातून वासुदेव बधान असे उमेदवार जाहीर केलेले आहेत.

हेही वाचा:

Back to top button