हिजाबविरोधी आंदोलनात आता ऑस्कर विजेत्या कलाकारांची उडी, समर्थनासाठी केली ही कृती | पुढारी

हिजाबविरोधी आंदोलनात आता ऑस्कर विजेत्या कलाकारांची उडी, समर्थनासाठी केली ही कृती

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनाचे पडसाद आता जगभर उमटू लागले आहेत. 20 वर्षांच्या महसा अमिनीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जगभरात या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या देशांच्या संख्येत वाढ होते आहे.

पॅरिसमध्ये आंदोलनकाऱ्यांनी इराणी दूतावासाबाहेर आंदोलन केलं. जवळपास हजाराहून अधिक लोकांनी या आंदोलनात हिजाबविरोधच समर्थन केलं. या आंदोलनात स्त्रिया आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होते. लंडन मध्येही दूतावासाबाहेर आंदोलन केलं गेलं. लंडनमध्ये आंदोलनकारी आणि पोलिस यांच्यात काही ठिकाणी झटापटही झाली. इराकमध्ये हिजाबबाबत लागू असलेल्या कठोर नियमांबाबत जगभरात आता आवाज उठवला जात आहे. तसेच या आंदोलनात सोशल मिडियाच्या माध्यमातूनही इराणी महिलांना पाठिंबा दिला जातो आहे.

विशेष म्हणजे ऑस्कर विजेत्या कलाकारांनीही आता या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. ऑस्कर विजेते मेरियन कोटीलॉर्ड आणि जुलीयट बिनोचे यांनी सोशल मिडियावर केस कापणारा व्हीडियो पोस्ट करून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. बिनोचे यांचा हा व्हीडियो सोशल मिडियावर hair for freedom या hashtag ने शेयर होऊ लागला आहे. या सोबत इतर सेलिब्रिटीही या आंदोलनात उतरू लागले आहेतअभिनेत्री शारलेट रॅपलिंगहिनेही आईसोबत केस कापतानाचा व्हीडियो शेयर केला आहे. आंदोलनकर्त्यांच्या धाडसासाठी हे कॅप्शन देत तिने हा व्हीडियो शेयर केला आहे. 

काय आहेत हिजाब संदर्भात इराणमधील कायदे :

9 वर्षं वय पूर्ण केलेल्या प्रत्येक मुलीने हिजाब घालणं इराणमध्ये बंधनकारक आहे.

सार्वजनिक ठिकाणी जाताना प्रत्येक महिलेच्या डोक्यावर हिजाब असणं बंधनकारक आहे.

या नियमांचं योग्य पद्धतीने पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी खास पोलिसही तैनात केले आहेत.

जर कोणत्याही महिलेने हा नियम तोडला की 74 चाबकाचे फटके देणं ते 16 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देणं इथपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

Back to top button