नाशिक : मंदिरासमोरील बुलेट चोरटयाने पळवली | पुढारी

नाशिक : मंदिरासमोरील बुलेट चोरटयाने पळवली

चांदवड  : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील देवरगाव येथील हनुमान मंदिरासमोर लावलेली ४५ हजार रुपयांची बुलेट (एम. एच. १५, ई. जी. ०५०१) मोटरसायकल अज्ञाताने चोरून नेली. या घटनेबाबत किरण शांताराम घोलप (३१, पिंपळद) याने वडनेरभैरव पोलीसात फिर्याद दिल्याने चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडनेरभैरवचे सहा. पोलीस निरीक्षक गौतम तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जे. टी. मोरे पुढील तपास करीत आहे.

हेही वाचा:

Back to top button