नाशिक : 'नशामुक्ती जुलूस'व्दारे शहर ड्रग्ज-फ्री करण्यासाठी आशिकान-ए-रसूलची जनजागृती | पुढारी

नाशिक : 'नशामुक्ती जुलूस'व्दारे शहर ड्रग्ज-फ्री करण्यासाठी आशिकान-ए-रसूलची जनजागृती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

“हमारी नस्लों को नशे से बाहर निकालना हमारी जिम्मेदारी है”, “से नो टू ड्रग्जस्” “नशा एक खतरनाक वायरस है” याप्रकारे आशिकान-ए-रसूल कमिटीव्दारे व्यसनाविरोधात आवाज उठवून शहरात जनजागृतीपर नशामुक्ती जुलूस काढण्यात आला. नाशिक पोलिसांच्या सहकार्याने “ड्रग्ज-फ्री” नाशिक शहर करण्याचा चंग कमिटीने बांधला आहे.

 रविवारी (दि.२) ‘नशामुक्ती जुलूस’ काढण्यात आला. शहरातील चौकमंडई येथून पोलिस आयुक्त व खतिब-ए-शहर यांच्या उपस्थितीत नशामुक्ती जुलूसची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांकडून नागरिकांना ड्रग्ज मुक्त शहर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. आगामी ईद-ए-मिलादनिमित्त शहरात १२ दिवस एमडी ड्रग्ज्च्या विरोधात जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे. तर रविवार, दि. ९ ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत जुने नाशिकमधील खडकाळी, मुलतानपुरा, दखणीपुरा, बागवानपुरा, कथडा, नागजी, वडाळारोड व वडाळागाव भागात जनजागृती करण्यात येत आहे.

या मार्गाव्दारे काढली जनजागृतीपर मिरवणूक….
बागवानपुरा, भोईगल्ली, कथडा, शिवाजी चौक, नाईकवाडीपुरा, मीरा दातार चौक, आझाद चौक, पठाणपुरा, बुधवारपेठ, आदम शाह चौक, काझीपुरा, कोकणीपुरा, इमाम अहमद रझा, खडकाळी, हुसैनी चौकमार्गे पवित्र बडी दर्गा शरीफ मिरवणूकीची सांगता करण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button