काँग्रेसच्या ३ राष्ट्रीय प्रवक्त्यांचा राजीनामा

काँग्रेसच्या ३ राष्ट्रीय प्रवक्त्यांचा राजीनामा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाच्या तीन राष्ट्रीय प्रवक्त्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार राजीनामा दिल्याची माहिती पक्षाचे नेते व राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी आज (रविवार) पत्रकार परिषदेत दिली.
माझ्यासह दीपेंद्र हुडा आणि सय्यद नासिर हुसेन यांनी नवीन अध्यक्षांच्या निष्पक्ष निवडणुकीसाठी राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे, असे वल्लभ यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या बाजूने प्रचाराची जबाबदारी या तिघांवर सोपवण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मी उमेदवारी अर्ज भरला त्याच दिवशी मी उदयपूरमध्ये घेतलेल्या 'एक व्यक्ती एक पद' या पक्षाच्या निर्णयानुसार राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. मी आज अधिकृतपणे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या प्रचाराला सुरुवात करत आहे. आज महात्मा गांधीजी आणि लालबहाद्दूर शास्त्रीजींची जयंती आहे. म्हणून मी हा दिवस प्रचाराच्या शुभारंभासाठी निवडला आहे. गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तर शास्त्रीजींनी देश सुरक्षित ठेवताना 'जय जवान, जय किसान'चा नारा दिला. त्यामुळे निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही, असे खर्गे म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news