नाशिक : उद्योजक सोनवणे खून प्रकरणी दोघे जेरबंद | पुढारी

नाशिक : उद्योजक सोनवणे खून प्रकरणी दोघे जेरबंद

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील उद्योजक शिरीष गुलाबराव सोनवणे (56) खून प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. तब्बल वीस दिवसांनंतर पोलिसांना संशयितांचा छडा काढण्यात यश मिळाले. सोनवणे यांचे अपहरण करून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

तपासात अडसर निर्माण होऊ नये तसेच संशयितांच्या साथीदारांना फरार होण्यास मदत मिळू नये, यासाठी पोलिसांनी या दोघा संशयितांची नावे जाहीर करण्यास तूर्त नकार दिलेला आहे. याविषयी शहर पोलिस आयुक्त कार्यालयातून सविस्तर माहिती दिली जाईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. नाशिकरोड पोलिसांनी संशयितांचे छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. त्यांच्याविषयी कुणालाही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांकडे संपर्क साधावा, असे आवाहनदेखील केले होते. गत नऊ सप्टेंबरला सायंकाळी साडेचारला सोनवणे यांचे तीन संशयितांनी अपहरण करून खून केला होता. यासंदर्भात गजानन सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली होती.

हेही वाचा:

Back to top button