पिंपरी : पतीच्या मृत्यूची खोटी कागदपत्रे देऊन फसवणूक | पुढारी

पिंपरी : पतीच्या मृत्यूची खोटी कागदपत्रे देऊन फसवणूक

पिंपरी : पतीच्या मृत्यूची खोटी कागदपत्रे देऊन पत्नीने तीन गुंठे जमीन तिच्या तसेच मुलांच्या नावावर करून घेतली. हा प्रकार तलाठी कार्यालय, देहूरोड येथे 30 मे 2022 रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडला.  इरफान मैनुद्दीन शेख (49, रा. सोलापूर) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 28) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, रुक्साना इरफाने शेख (38, रा. विकासनगर, किवळे, देहूरोड) हिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी देहूरोड येथील तलाठी कार्यालयात मिळकत कर भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना समजले की, सातबारा उतार्‍यावरून त्यांचे नाव कमी करून तेथे फिर्यादी यांची पत्नी रुक्साना शेख, मुलगा अमन इरफान शेख, मुलगी निरोन इरफान शेख यांची नावे लावण्यात आली आहेत. त्यानंतर फिर्यादी यांनी चौकशी केली असता आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या मृत्यूचा खोटा दाखला तलाठी कार्यालय येथे सादर करून किवळे येथील तीन गुंठे मोकळी जमीन तिच्या व मुलांच्या नावे करून घेतल्याचे समोर आले.

Back to top button