Delhi News : दोन गटातील भांडणातून जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यावर रुग्णालयात गोळीबार | पुढारी

Delhi News : दोन गटातील भांडणातून जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यावर रुग्णालयात गोळीबार

पुढारी ऑनलाइन डेस्क : Delhi News जामिया विद्यापीठातील दोन गटातील भांडणातून एका विद्यार्थ्यावर होली फॅमिली रुग्णालयात गोळीबार करण्यात आला. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. विद्यापीठातील कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या भांडणातूनच नंतर हा गोळीबार झाला. गोळीबारात विद्यार्थी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

नौमान अली असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. तर जलाल हे गोळीबार करणा-या विद्यार्थ्याचे नाव आहे.

Delhi News पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात काल गुरुवारी सायंकाळी लायब्ररीत विद्यार्थ्यांच्या दोन गटात भांडणे होऊन मारामारी झाली. यामध्ये नोमन चौधरी या विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला जवळच्या होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौधरी हा नोमानचा अली याचा मित्र आहे. त्याच्यावर उपचार सुरू असताना नौमान अली त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात आला होता.

Delhi News त्याचवेळी प्रतिस्पर्धी गटातील जलाल हा विद्यार्थी त्याच्या मित्रांसह रुग्णालयात आला आणि त्याने आपत्कालीन वॉर्डाबाहेर नौमन अलीवर गोळीबार केला. या गोळीबारात अलीच्या टाळूला वरवरची जखम झाली होती. त्याच्यावर सुरुवातीचे उपचार केल्यानंतर त्याला एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले.

Delhi News दरम्यान, घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली. तसेच भीती निर्माण झाली होती. मात्र आता सर्व काही नियंत्रणात आहे. तसेच नौमन अली आता पोलिसांना स्टेटमेंट देण्यासाठी आता योग्य आहे, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
तर घटनास्थळी एक पोलीस पथक पाहणी करत आहे.

हे ही वाचा :

South Africa VS India T 20I : बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी

RBI hikes repo rate | कर्जदारांना पुन्हा झटका, आरबीआयकडून रेपो रेटमध्ये ५० बेसिक पॉईंट्सची वाढ

Back to top button