नाशिक : नांदगाव शहरात विविध विकास कामे सुरु होणार : आ. सुहास कांदे | पुढारी

नाशिक : नांदगाव शहरात विविध विकास कामे सुरु होणार : आ. सुहास कांदे

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव शहरात विविध विकासकामास प्रारंभ करण्यात आला असून जैन धर्मशाळा ते नगरपरिषद रस्ता काँक्रीटीकरणाचे उद्घाटन आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. लेंडी नदीपात्राच्या खोलीकरणासह शहरातील विविध विकास कामे लवकरच मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उदघाटनप्रंसगी ते बोलत होते. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गरजेचा आणि नांदगाव शहराच्या पश्चिम भागाला जोडणाऱ्या, शाकंबरी नदीवरील गरजेच्या असलेल्या पुलाचे भूमिपूजन आ. कांदे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.

जैन धर्मशाळा ते नगरपरिषद रस्ता काँक्रीटीकरण तसेच शाकंबरी नदीवर पुलाचे बांधकाम, नदीचे खोलीकरण करणे यासारख्या कामांचा विविध विकासकामांमध्ये समावेश आहे. शहरातील रुंदीकरण, संरक्षक भिंत आदी कामांसाठी २० कोटीचा निधी मंजूर झाला असून, रस्त्यावरील फुटपाथ मार्गालगत नारळाची झाडे लावून त्यांना सातत्याने पाणी मिळावे अशी योजना केली जाणार आहे. तसेच पाडलेल्या मटन मार्केटच्या जागी पूल बांधून त्यावरुन दळणवळण सोयीचे होईल अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठीचे टेंडर नोटीस निघणार असून त्याचे काम सुरु होणार असल्याचेही आ. कांदे यांनी सांगीतले. त्याचप्रमाणे गावातून ज्याठिकाणी पाण्याचा शिरकाव होतो त्यासाठी देखील विशेष काम केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याप्रंसगी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, विलास आहेर, राजेंद्र देशमुख, किरण देवरे, प्रमोद भाबड, आनंद कासलीवाल, साईनाथ पगारे, मुग्धा परदेशी, सा. बा. चे उपअभियंता चोळके, अमोल नावंदर, प्रशांत खैरनार, भरत मोकळ, भरत पारख आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button