जळगाव : लाच प्रकरणी वजनमापे निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

जळगाव : लाच प्रकरणी वजनमापे निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

रावेर शहरातील वजनमापे निरीक्षकांना ३२ हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. सुनील खैरनार (रा. एमआयटी कॉलेजजवळ, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मंगळवारी (दि. २७) दुपारी साडेतीनच्या सुमारास रावेर शहरापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या एस. एस. सन्स पेट्रोलपंपावर जळगाव एसीबीने सापळा लावून अटक केली.

रावेर शहरापासून २ किलोमीटर अंतरावर तक्रारदाराचा एस. एस. सन्स पेट्रोलपंप आहे. त्यांनी तो ११ महिन्यांच्या कराराने चालवण्यास घेतला आहे. पंपावरील नोझल मशीन्स स्टॅपिंग करून देण्यासह कुठलीही अडचण येऊ न देण्यासाठी आरोपी तथा रावेर वजनमापे निरीक्षक सुनील खैरनार यांनी शासकीय फी व्यतिरिक्त ३२ हजारांची लाच मागितली. मात्र, तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. खैरनार हे मंगळवारी (दि. २७) पंपावर लाच रक्कम घेण्यासाठी आल्यानंतर पंचांसमक्ष त्यांना अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील, निरीक्षक एन. एन. जाधव व सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा:

Back to top button