पिंपळनेर : कर्जाच्या खाईतून निघून सामोडेची विकासो आता प्रगतीच्या वाटेवर | पुढारी

पिंपळनेर : कर्जाच्या खाईतून निघून सामोडेची विकासो आता प्रगतीच्या वाटेवर

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा 
पंधरा लाख रुपये कर्जाच्या विळख्यात सापडलेली विविध कार्यकारी सोसायटी कर्जमुक्त होऊन प्रगतीच्या वाटेवर आरूढ झाली आहे. येथील शेतकऱ्यांना ९९ लाख ३ हजार ९०० रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा बँक संचालक हर्षवर्धन दहिते यांनी दिली. सामोडे येथील आदिवासी विकासोची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली.
सभेप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष रमेश महंत,उपाध्यक्ष विश्वनाथ घरटे,अनिल शिंदे, सुभाष घरटे, मंजुळा घरटे, निर्मला, नाना सोनवणे, उमेश शिंदे,अर्जुन सोनवणे, दत्तात्रय शिंदे, पांडुरंग भदाणे, तुकाराम दहिते,उपसरपंच प्रकाश शिंदे, ग्रामस्थ उपसरपंच सचिन शिंदे, शंकर घरटे,अभय शिंदे,नवल घरटे, ए.डी.शिंदे, चंद्रकांत घरटे यासंह ग्रामस्थ उपस्थित होते. सोसायटीने चालू वर्षी २०२२-२०२३ एकूण ५९ सभासदांना ९९ लाख तीन हजार ९०० रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. तसेच यावेळी सामोडे जुनागावातील सोसायटीची जुनी प्रॉपर्टी इमारतीच्या लिलावाबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती सर्वानुमते लिलाव संदर्भात मंजुरी देण्यात आली. त्यानंतर गत वर्षाच्या लेखाजोखाचे वाचन करण्यात आले. शिक्षक एन.एन शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव कुवर यांनी सभेतील विषय वाचून सर्व सभासद संचालक मंडळाने एकमताने मंजूर करून घेतले. रमेश महंत यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा:

Back to top button