कोंडव्यात पुणे पोलिस आयबीची छापेमारी; पीएफआयच्या सहा कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात | पुढारी

कोंडव्यात पुणे पोलिस आयबीची छापेमारी; पीएफआयच्या सहा कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे पोलीस आणि आयबीने संयुक्त कारवाई करत मंगळवारी पहाटेपासूनच कोंडव्यात मोठी छापेमारी सुरू केली. या कारवाईत पीएफआयच्या सहा कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करत दोघांना अटक केली होती.

ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची कोंढवा पोलिस स्थानकात आयबीचे आधिकारी कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, जिल्हाधीकारी कार्यालयासमोरील आंदोलनाप्रकरणी देखील पोलिस चौकशी करत असल्याचे माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button