नाशिक : कोथिंबीर जुडीला मिळतोय वीस हजार पाचशे रुपयांचा विक्रमी भाव

नाशिक : कोथिंबीर जुडीला मिळतोय वीस हजार पाचशे रुपयांचा विक्रमी भाव
Published on
Updated on

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (दि.26) सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबिरीला वीस हजार पाचशे रुपये भाव मिळाला. नाशिक बाजार समितीत नाशिक तालुक्यातील म्हसरूळ मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसरा, गिरणारे, गोवर्धन, दुगाव, धोंडेगाव, सिन्नर, निफाड, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर तसेच पुण्यातील खेड, मंचर हुनही येथून पालेभाज्यांची आवक होत असते. सोमवारी पालेभाज्यांचे लिलाव झाले असता साईधन कंपनीत दिंडोरी तालुक्यातील नवळपाडा गावातील शेतकरी विनायक लक्ष्मण वाघिरे हे चायना कोथिंबीर घेऊन आले होते. यांच्या कोथिंबिरीस वीस हजार पाचशे रुपये शेकडा बाजारभाव मिळाला. सदर कोथिंबीर नितीन लासुरे या व्यापार्‍याने घेतली असून मुंबई, गुजरात, सुरत येथील मार्केटला पाठविणार आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news