नाशिक : स्वच्छता अमृत महोत्सवांतर्गत ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धा | पुढारी

नाशिक : स्वच्छता अमृत महोत्सवांतर्गत ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्र शासनाने ‘स्वच्छता अमृत महोत्सव’ हा उपक्रम संपूर्ण देशभरात आयोजित केला आहे. या उपक्रमामध्ये ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ या स्पर्धेचा समावेश आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आवाहन केले आहे.

कचर्‍यातील टाकाऊ वस्तूंपासून खेळणी तयार करणे, हा या स्पर्धेचा निकष आहे. ही स्पर्धा 26 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका शासनाच्या पोर्टलवर 26 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत नोंदविणे अनिवार्य आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, स्पर्धेकरिता वैयक्तिक व समूह असे दोन गट करण्यात आले आहेत. या स्पर्धेत शालेय विद्यार्थी, स्टार्टअप्स, बचतगट, खेळणी उत्पादक, डिझायनर आदी आपला सहभाग नोंदवू शकतात. स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी अंतिम मुदत दि. 11 ऑक्टोबर आहे. सहभाग नोंदविण्यासाठी innovateindia.mygov.in या लिंकचा वापर करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रशांत ठोके – मोबाइल. क्र. 9970434259 तसेच मोहित जगताप – 7020043611 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी केले आहे.

हेही वाचा:

Back to top button