इंदापूर : महोदया, आमच्याही आरक्षणाकडं लक्ष द्या; धनगर समाजाचे अर्थमंत्री यांना निवेदन | पुढारी

इंदापूर : महोदया, आमच्याही आरक्षणाकडं लक्ष द्या; धनगर समाजाचे अर्थमंत्री यांना निवेदन

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: केंद्राकडून पाच राज्यांतील 12 जातींच्या शब्दांतील झालेल्या दुरुस्त्यांच्या धर्तीवर धनगड शब्दाची दुरुस्ती करून धनगर समाजाचा समावेश अनुसूचीत जमाती प्रवर्गात करावा अशी मागणी करत धनगर ऐक्य परिषदेकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्याकडे ‘महोदया, आमच्याही आरक्षणाकडं थोडं लक्ष द्या’ अशी साद घातली.

तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड या राज्यांतील 12 जातींच्या हिंदी व इंग्रजी भाषेच्या उच्चारांच्या शब्दांच्या दुरुस्तीचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या या शब्द दुरुस्तीचा निर्णय मंत्रिमंडळाने घेणे अपेक्षित होते; मात्र तो घेण्यात आला नाही. धनगर समाजाची गेले अनेक वर्षांपासून सरकारकडे असणारी मागणी प्रलंबित आहे. अशी मागणी परिषदेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत तंरगे यांनी निवेदनातून केली.

Back to top button