नाशिक : पतीचा निर्घृण खून करून बायकोने ठोकली धूम | पुढारी

नाशिक : पतीचा निर्घृण खून करून बायकोने ठोकली धूम

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : घरगुती वादातून पत्नीने आपल्या पतीचा निघृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.२४) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दिलीप रंगनाथ कदम (५४) असे खून झालेल्या इसमाचे नाव असून त्याचा मृतदेह पोलिसांना घरातून कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

इंदिरानगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वडाळागावातील माळी गल्लीत कदम दाम्पत्य राहत होते. मुलगादेखील त्यांच्यापासून मागील काही महिन्यांपासून वेगळा राहत होता. मयत कदम यांच्या भावाने व मुलाने शनिवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घर गाठले. दरवाजाला कुलुप असल्याने काका-पुतण्यांनी मिळून कुलुप तोडले असता घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली असल्याचे आढळले.

यावेळी दिलीप कदम हे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेले आढळले. यावेळी त्यांनी इंदिरानगर पोलिसांना माहिती कळविली. माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. याप्रकरणी कदम यांचा मुलाच्या फिर्यादीवरून रात्री उशीरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचलंत का?

Back to top button