नाशिक : कॉलेजरोडला आय- गेन स्पर्धा उत्साहात | पुढारी

नाशिक : कॉलेजरोडला आय- गेन स्पर्धा उत्साहात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगर येथे एच. आर. डायरेक्टर प्राचार्या दिप्ती देशपांडे यांच्या कल्पनेतून संस्थेतर्फे काॅलेजरोड म्हणून परिचित असलेल्या महाविद्यालयीन स्तरावर आय-गेन स्पर्धा घेण्यात आली. आय-गेन स्पर्धेअंतर्गत महाविद्यालयात काव्यवाचन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, एकपात्री अभिनय, गीतगायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

प्राचार्य जे. ए. शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धेमधून उत्तम नेतृत्व गुणांचा विकास व्हायला हवा असे आवाहन केले. स्पर्धेअंतर्गत वक्तृत्व स्पर्धेत सानिया साजू, तेजस्विनी कोल्हे, ईशान्या पाटील, अस्मिता गांगुर्डे, अलमीरा शेख. काव्य वाचन स्पर्धेत आरोही बेलन, मित कुलकर्णी, शर्वरी चंद्रात्रे, गायत्री गांगुर्डे, अलमीरा शेख. तर गीत गायन स्पर्धेत मित कुलकर्णी, शर्वरी चंद्रात्रे, रोहित काळे, अदिती देसले, सानिया साजू. एकपात्री अभिनय स्पर्धेत मित कुलकर्णी, अनुला दुबे, साई पाटील यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळवला. तसेच प्रा. आर. एस. गोसावी, प्रा. एम. बी. सोनवणे. प्रा. यु. बी. पठारे यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. रेखा घुगे यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. सायमा अन्सारी, प्रा. अश्विनी भंडारी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा. एम. एस. बोऱ्हाडे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य मिळाले.

हेही वाचा:

Back to top button