नाशिक : पंचवटीत फटाके विक्री गाळ्यांचे फेरलिलाव | पुढारी

नाशिक : पंचवटीत फटाके विक्री गाळ्यांचे फेरलिलाव

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या फटाके विक्री गाळ्यांच्या लिलावातील उर्वरित गाळ्यांसाठी बुधवारी (दि.14) पार पडलेल्या फेरलिलाव प्रक्रियेला व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन दिवाळीच्या दोन महिने आधीच महापालिकेच्या पंचवटी विभागाने फटाके विक्री गाळ्यांची लिलावप्रक्रिया गेल्या 27 जुलैला घेतली होती. मात्र तांत्रिक कारणास्तव यातील काही गाळ्यांचे लिलाव प्रलंबित होते. यासाठी बुधवारी फेरलिलाव झाले. संपूर्ण लिलावप्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी विभागीय अधिकारी कैलास राभडिया, अधीक्षक मंगेश वाघ, सहायक अधीक्षक भूषण देशमुख, राजेश सोनवणे, दीपक मिंदे, राहुल बोटे, सीमा गायकवाड, सनी काळे, विद्या शेरताटे, संजय बोरसे यांसह कर्मचारी उपस्थित होते.

दीड लाखाचा महसूल :
तपोवन, साधुग्राम येथील 3 पैकी 2, अमृतधाम आणि म्हसरूळ प्रत्येकी 1 अशा एकूण 5 गाळ्यांची लिलावप्रक्रिया पार पडली. यापैकी 4 गाळे लिलावात घेण्यात आले. यातील तपोवन येथील लिलावातून 50 हजार 780 रुपये, अमृतधाम येथून 31 हजार 54 रुपये, म्हसरूळ येथून 27 हजार 750 असे एकूण 1 लाख 9 हजार 584 इतके उत्पन्न प्राप्त झाले. तसेच, 40 हजार रुपये अनामत रक्कम असे सर्व मिळून 1 लाख 49 हजार 584 रुपयांचा भरणा फटाका विक्री गाळ्यांमधून मनपाला प्राप्त झाला.

हेही वाचा:

Back to top button