बुलढाणा : एस.टी.बसच्या पत्र्यामुळे दोघांचे हात तुटले; मलकापूर जवळील दुर्घटना | पुढारी

 बुलढाणा : एस.टी.बसच्या पत्र्यामुळे दोघांचे हात तुटले; मलकापूर जवळील दुर्घटना

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: रस्त्यावर धावत असलेल्या एस.टी.बसच्या बाहेर आलेल्या पत्र्यामुळे दोन जणांचे हात तुटून पडल्याची धक्कादायक घटना आज (दि.16) शुक्रवारी सकाळी 6 वाजता मलकापूर तालुक्यातील आव्हा गावाजवळ घडली.

मलकापूर आगाराची बस (क्र.एमएच40एन9121) पिंपळगाव देवी गावाकडे चालली होती. या बसवर भाऊराव सुर्यवंशी हे चालक होते. आव्हा गावाजवळ या एस.टी.बसच्या बाहेर आलेल्या पत्र्यामुळे स्थानिक शेतकरी परमेश्वर सुरडकर (45) व रस्त्याच्या कडेला व्यायाम करणारा युवक विकास गजानन पांडे(22) या दोघांचे हात तुटून पडले. दोघांचीही प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मलकापूर आगारात निष्काळजीपणाच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करत तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ आगारात पोहोचून जमावाला नियंत्रणात आणले.

हेही वाचलंत का?

Back to top button