नाशिक : स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके, ‘वेदांता’वरुन युवासेनेची घोषणाबाजी | पुढारी

नाशिक : स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके, 'वेदांता'वरुन युवासेनेची घोषणाबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरात येथे गेल्याप्रकरणी नाशिक शहर युवासेनेतर्फे शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर गुरुवारी (दि.15) शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने युवासेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख दीपक दातीर, जिल्हा सरचिटणीस गणेश बर्वे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे आंदोलन झाले. याप्रसंगी भाजप आणि शिंदे गट सरकारच्या विरोधात विविध घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला. सुमारे 1.45 लाख कोटी रुपयांचा आणि एक लाखापेक्षा अधिक तरुणांना रोजगार मिळवून देणारा प्रकल्प केंद्र सरकारला खूश करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने गुजरातला पळवून लावल्याचा आरोप युवासेनेने केला. आंदोलनात रूपेश पालकर, बालम शिरसाठ, ऋतुराज पांडे, सरप्रीत बल, समर्थ मुठाळ, रामदास अहिरे, आकाश उगले, सचिन निकम, पवन दातीर, कल्पेश पिंगळे, गौरव जाधव, सुदर्शना चंदनानी, आनंद अहिरे, अभिजित गवते, ओंकार उदावंत आदी युवासैनिक सहभागी झाले होते.

हेही वाचा :

Back to top button