नाशिक : तोटा भरून काढण्यासाठी सिटीलिंकच्या प्रवासी पासमध्ये 25 टक्के वाढ | पुढारी

नाशिक : तोटा भरून काढण्यासाठी सिटीलिंकच्या प्रवासी पासमध्ये 25 टक्के वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंक बससेवेला गेल्या आर्थिक वर्षात 20 कोटी 21 लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी सिटीलिंकने अनेक उपाययोजना घेतल्या असून, प्रवासी पासेसच्या दरात 25 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय सिटीलिंकच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवारी (दि.14) घेण्यात आला.

महापालिका आयुक्त तथा नाशिक महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीत 2021-22 या आर्थिक वर्षाचा ताळेबंद सादर करण्यात आला. बैठकीत सद्यस्थितीत सुरू असलेल्या शहर बससेवेचा आढावा घेण्यात आला. वाढत्या इंधनखर्चामुळे सिटीलिंकचा तोटा कमी करण्यासाठी प्रवासी पासेसच्या दरात वाढ करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत राज्य महामार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांची महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाची मालकी असलेल्या निमाणी बसस्थानकाचा वापर सिटीलिंकतर्फे केला जात असल्यामुळे या बसस्थानकाचे विद्युत बिल तसेच अन्य किरकोळ दुरुस्त्यांचा खर्च सिटीलिंकच्या माध्यमातून करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली.

अशी आहे पासेसची भाडेवाढ (रुपयांत)
कालावधी       सध्याचे दर        नवीन दर
1 दिवस         100                    100
3 दिवस         200                    250
7 दिवस         400                    500
30 दिवस       1500                  2000
3 महिने         3750                  5000
6 महिने         6750

हेही वाचा:

Back to top button