नाशिक जिल्ह्यात 'लम्पी'ची एन्ट्री ; 'या' गावांतील जनावरांमध्ये आढळली लक्षणे | पुढारी

नाशिक जिल्ह्यात 'लम्पी'ची एन्ट्री ; 'या' गावांतील जनावरांमध्ये आढळली लक्षणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यभरात थैमान घालणाऱ्या लम्पी आजाराची जिल्ह्यात एन्ट्री झाली आहे. सिन्नर तालूक्यातील मौजे पांगरी व दुसंगवाडी या दोन गावांमधील जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रादुर्भाव झालेल्या गावांपासून १० किलोमीटरच्या परिघात प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घाेषित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी केले आहे.

विभागातील नगर, धुळे, जळगावसह राज्यात अकोला, कोल्हापूर, बीड, पुणे, सातारा, बुलढाणा, औरंगाबाद, लातूर, अमरावती व उस्मानाबाद जिल्ह्यातील जनावरांमध्ये लंम्पी आजाराची लक्षणे आढळून आली आहे. त्यामुळे सरकार अलर्ट मोडवर असतानाच आता नाशिक जिल्ह्यातही जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. सिन्नर तालूक्यातील पांगरी व दुसंगवाडी येथील जनावरांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. या नुमन्यांचा अहवाल सकरात्मक आल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे.

लंम्पीचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या गावांपासून १० किलोमीटरचा परिघातील क्षेत्र हे प्रतिबंधात्मक घोषित करताना बाधित क्षेत्रातील जनावरांची शेडचे निर्जंतुकीकरणाचे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात जनावरे खरेदी-विक्री, जनावरांचा बाजार भरविणे, जत्रा व प्रदर्शन आणि जनावरांच्या वाहतूकीवर बंदी घालण्यात आली आहे. प्रादुर्भाव झालेल्या गावांपासून पाच किलोमीटर परिघातील गावांमध्ये जनावरांचे गोट पॉक्स लसीकरण तातडीने करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत.

शेतकऱ्यांची डोकेदुखीत भर

गेल्याच आठवड्यात सिन्नरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आधीच धास्तावला आहे. त्यातच तालूक्यात आता लंम्पी आजाराने एन्ट्री केल्याने शेतकरी तसेच दुध उत्पादक व्यावसायिकांच्या डाेकेदूखीत भर पडली आहे.

हेही वाचा :

Back to top button