नाशिक : अन्नपाण्याच्या शोधात “तो” शिरला भरवस्तीत | पुढारी

नाशिक : अन्नपाण्याच्या शोधात "तो" शिरला भरवस्तीत

नाशिक (दातली) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथे घराच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात बिबट्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत. रात्री एकच्या सुमारास बान्नी गल्ली येथे संजय सखाहरी नाठे यांच्या घराजवळ बिबट्या दिसून आल्याने परिसरात मोठी दहशत पसरली आहे.

बिबट्याने संजय नाठे यांच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळीवर हल्ला केला. परंतु शेजारीच राहणारे सुरेश नाठे हे शेळ्यांच्या आवाजाने घराबाहेर आल्याने त्यांनी बिबट्याला हुसकावून लावले. बिबट्या घराकडे येत असताना त्याच्या हालचाली कॅमेरात कैद झाले आहेत. परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.

अन्नपाण्याच्या शोधात लोकवस्तीत
अन्नपाण्याच्या शोधात बिबट्या लोकवस्तीत येत असून, पाळीव प्राण्यांची शिकार करत आहे. या रस्त्याने रात्रीच्या वेळी मुसळगाव येथे औद्योगिक वसाहतीत शेकडो कामगार ये-जा करत असल्याने त्यांच्यावरही हल्ले होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

Back to top button