Gold prices Today : सोने-चांदी दरात घसरण, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

file photo
file photo

पुढारी डेस्क : सोने, चांदीच्या दरात (Gold prices Today) आज गुरुवारी सकाळच्या व्यवहारात घट दिसून आली. २४ कॅरेट सोन्याच्या दर ५४० रुपयांनी कमी होऊन तो प्रति १० ग्रॅम ५०,६२० रुपयांवर खुला झाला. तर चांदी प्रति किलोमागे १,१०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो ५२,८०० रुपयांवर आला आहे.

दरम्यान, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५०० रुपयांनी कमी होऊन ४६,४०० रुपयांवर आला आहे. मुंबई, कोलकातामध्ये २४ कॅरेट सोने ५०,६२० रुपयांना विकले जात आहे. तर या दोन शहरांत २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,४०० रुपये आहे. दिल्लीत २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे ५०,७७० रुपये आणि ४६,५५० रुपये आहे. चेन्नईत २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे ५१,५५० आणि ४७,२५० रुपये आहे.

दरम्यान, डॉलरने उच्चांक गाठल्याने गुरुवारी सोन्याच्या किमतीवर त्याचा परिणाम दिसून आल्याचे दिसून आले. मजबूत झालेला अमेरिकी डॉलर आणि वाढत्या अमेरिकी ट्रेझरी उत्पन्नामुळे भारतातील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Gold prices Today शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news