नाशिक : मुलीचे अपहरण करुन अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षे कारावास | पुढारी

नाशिक : मुलीचे अपहरण करुन अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षे कारावास

नाशिक : 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणार्‍या नराधमास न्यायालयाने 20 वर्षांचा कारावास व 13 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर दुसर्‍या आरोपीस अपहरण केल्याप्रकरणी पाच वर्षांचा कारावास व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 24 जून 2020 रोजी सायंकाळी सुरगाणा तालुक्यातील बार्‍हे येथे ही घटना घडली होती.

हरिश्चंद्र नथू गायकवाड (23) व विलास पुंडलिक चौधरी (22, दोघे रा. वरंभे, ता. सुरगाणा) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघा आरोपींनी मुलीचे अपहरण करून सुरगाणा तालुक्यातील चिकाडी शिवार, दिंडोरी तालुक्यातील जऊळके वणी, निफाड येथील ओझर सोनेवाडी या ठिकाणी नेऊन 24 जून ते 4 जुलै 2020 दरम्यान अत्याचार केला. तर विलास चौधरी याने पीडितेचे अपहरण करण्यास गायकवाड यास मदत केली होती. दोघांविरोधात पोक्सोसह बलात्कार, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांनाही अटक करून तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सात साक्षीदार तपासले. त्यात दोघांविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी गायकवाड व चौधरी दोघांनाही शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा :

Back to top button