चाळिशीत लोक असतात नाखूश! | पुढारी

चाळिशीत लोक असतात नाखूश!

लंडन : संशोधकांनी म्हटले आहे की चाळिशीत आल्यानंतर लोक बहुतांश वेळा नाखूश राहू लागतात. त्यामध्येही महिलांचा समावेश अधिक असतो. त्यांना जुन्या गोष्टी आठवू लागतात आणि भविष्याची चिंता सतावू लागते. कौटुंबिक जीवनातील ताणतणाव व कामाचा ताण यामुळे या वयोगटातील लोक आनंदी नसतात. 400 हून अधिक संशोधनात याविषयीचा दावा करण्यात आला आहे.

132 देशांच्या हॅपिनेस कर्व्हच्या डेटामध्ये या वयाचा परिणाम शिक्षण, वैवाहिक जीवन व रोजगाराची स्थिती यावर परिणाम करणारा ठरतो, हे लक्षात आले. विकसनशील देशांच्या द़ृष्टीने सर्वात कमी आनंद 48.2 वर्षे या वयात वाटू लागतो. शरीराची ऊर्जेची पातळी घटते. अर्थशास्त्रज्ञ व हॅपिनेस विषयाचे तज्ज्ञ कॅरल ग्रॅहम यांच्या म्हणण्यानुसार 34 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांकडे दोन दशकांमधील कठीण काळाचा अनुभव असतो. 2021 च्या डेटानुसार या वयोगटातील लोकांचा बहुतांश वेळ क्रीडा, अभ्यास व इतर घडामोडींऐवजी टीव्हीसमोर जास्त जातो. ते तरुणांच्या तुलनेत कमी व्यायाम करतात. त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. त्यामुळे या वयोगटातील लोकांनी आरोग्याच्या द़ृष्टीने स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Back to top button