नाशिक : चाडेगाव शिवारात बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद | पुढारी

नाशिक : चाडेगाव शिवारात बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा

चाडेगाव शिवारात ॲड. गणेश बबन मानकर यांच्या फार्म हाऊस परिसरात वनविभागने काही दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात बुधवार पहाटे बिबट्या जेरबंद झाला. जेरबंद झालेला बिबट्या सुमारे दहा वर्षाचा नर आहे. आतापर्यंत पकडलेल्या बिबट्यांमध्ये हा सर्वात मोठा बिबट्या असल्याची माहिती वनविभागाने दिली.

चाडेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात उसाचे मळे आहेत. त्यामुळे या परिसरात बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळते. मानकर यांच्या मळ्ळ्याला लागूनच जंगल आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याचा कायम वावर असतो. दोन-तीन वर्षांत या परिसरातून सुमारे अकरा बिबटे जेरबंद करण्यात आले. सतत या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांना एकटयाने शेतात काम करता येत नाही. टोळी करुन शेतात कामे करावी लागता. तर मळे विभागातील शेतकऱ्यांनी घरांभोवती मोठा तारेचे कपाऊंड करून घेतलेले आहे.

हेही वाचा:

Back to top button