नाशिक : माती कला बोर्डाला चालना देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार : आ. देवयानी फरांदे | पुढारी

नाशिक : माती कला बोर्डाला चालना देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार : आ. देवयानी फरांदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कुंभार समाजाच्या विकासासाठी माती कला बोर्डाला कार्यान्वित करून पूर्ण क्षमतेने चालना देण्यासाठी सरकारकडे नक्कीच पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार देवयानी फरांदे यांनी विद्यार्थी गुणगौरव समारंभाप्रसंगी दिले.

शर्मा मंगल कार्यालयात नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समितीच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. आमदार फरांदे यांनी पुढे सांगितले की, अठरा पगड जातींना त्यांच्या पारंपरिक व्यवसायासाठी साधनसामग्री मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षण जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. अध्यक्षस्थानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष सतीश दरेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ॲड. राहुल ढिकले, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद आहेर, संस्थेचे प्रदेश कोषाध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, उपाध्यक्ष वसंतराव घोडनदीकर, मनपा उपआयुक्त डॉ. दिलीप मेनकर, अशोक सोनवणे, उत्तमराव काळे, सुरेश बहाळकर, गणेश आहेर, अनंत कुंभार आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते १५० गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच सेवानिवृत्त बांधवांचा सत्कार करण्यात आला. रमाकांत क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष सोमनाथ सोनवणे यांनी स्वागत केले. संगीता जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. शहराध्यक्ष बाळासाहेब जोर्वेकर यांनी आभार मानले. अरविंद क्षीरसागर, के. के. चव्हाण, राधेश्याम गायकवाड, जगदीश मोरे, अशोक जाधव, श्याम जोंधळे, वसंत कुंभार, गंगाधर जोर्वेकर, बापू गारे, गुलाबराव सोनवणे, तुळशीराम मोरे, मारुती रसाळ, रमेश गायकवाड, सुवर्णा जाधव, शकुंतला जाधव, रंजना रसाळ आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजभूषण पुरस्काराचे मानकरी : विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी आणि समाजकार्य करणारे नाशिक महानगरपालिकेचे उपआयुक्त डॉ. दिलीप मेनकर, पुंडलिकराव सोनवणे, रमेश राजापूरकर, गोकुळ कुंभार, रमेश बहाळकर आदी मान्यवरांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कुंभार समाजभूषण पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा:

Back to top button