नाशिक : पोषण आहार ठेकेदारांच्या किचनची तपासणी करणार | पुढारी

नाशिक : पोषण आहार ठेकेदारांच्या किचनची तपासणी करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेसह खासगी अनुदानित शाळांना शालेय पोषण आहाराचा पुरवठा करताना अन्न शिजवण्यापासून त्याची वाहतूक करताना सर्व बाबी निविदेतील मानकानुसार केल्या जात आहेत की नाही याची काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे.

मनपा अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे हे 36 पात्र ठेकेदारांच्या किचन शेडची पाहणी करणार आहेत. संबंधित 36 किचनशेडबाबत तपासणीचा अहवाल या आधीच प्राप्त असताना अतिरिक्त आयुक्त खाडे पुन्हा झाडाझडती कशासाठी घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 2019 मध्ये 13 ठेकेदारांना आहार पुरवठ्याचे काम देण्यात आले होते. मात्र, त्यांच्याविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित 13 ठेकेदारांचे ठेके रद्द करण्याची कारवाई केली. कोरोनानंतर शाळा नियमित सुरू झाल्या. पोषण आहार पुरवठ्याचा ठेका देण्याकरता प्रक्रिया सुरू केली. त्यात जवळपास 55 संस्थांनी पुरवठ्याची तयारी दाखवली. मात्र, त्यातील 36 संस्था पात्र ठरल्या. त्यांच्या किचनशेडपासून तर अन्य सर्व कागदपत्रांची छाननी करण्यात आली आहे. ऑनलाइन मुदतीत कागदपत्रे सादर करता न आलेल्यांसाठी ऑफलाइन कागदपत्रे सादर करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यास आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ब्रेक लावला आहे.

हेही वाचा:

Back to top button