नाशिक : चार्जरच्या वायरने गळा आवळून बायकोला संपवलं, चारित्र्याचा संशय | पुढारी

नाशिक : चार्जरच्या वायरने गळा आवळून बायकोला संपवलं, चारित्र्याचा संशय

नाशिक : चारित्र्याचा संशय घेत पतीने मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून पत्नीचा खून केल्याचा प्रकार वडाळा गाव परिसरात उघडकीस आला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित रिजवान इसाक पठाण (34, रा. वडाळा गाव) यास अटक केली आहे.

रिजवान याचा हुमेरा ऊर्फ मिनाज रिजवान पठाण (29) सोबत विवाह झाला होता. मात्र, रिजवान हा हुमेराच्या चारित्र्याचा संशय घेत वारंवार वाद घालत असल्याची फिर्याद गुलाम गौस शकील शेख (रा. वडाळा रोड) यांनी दिली. सोमवारी (दि.15) मध्यरात्री हुमेरा झोपलेल्या असताना संशयित रिजवान याने चार्जरच्या वायरीने हुमेरा यांचा गळा आवळून खून केला. हा प्रकार उघडकीस येताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

हेही वाचा :

Back to top button