सातारा : दुर्गम भागातील गावात ‘हर घर तिरंगा’ मोहीम

सातारा : दुर्गम भागातील गावात ‘हर घर तिरंगा’ मोहीम

भणंग : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जावली तालुक्यातील दुर्गम डोंगर माथ्यावर वसलेल्या कुंभारगणी, मरडमुरे, रेंडिमुरा तसेच डोंगरमाथ्यावर असलेल्या वाडीवस्तीवर 'हर घर तिरंगा' मोहिमेंतर्गत झेंड्यांचे वाटप करून अभियानाची घराघरात जनजागृती करण्यात आली.

केंद्र शासनाच्या सूचना व नियमानुसार डोंगरमाथ्यावरील रहिवाशांनी आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा लावण्याचे आवाहन कुंभारगणीचे सरपंच संजय शेलाटकर, मरडमुरेचे सरपंच मारुती ढेबे यांनी ग्रामस्थांना केले. यावेळी प्रत्येक कुटुंबाला तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रशांत शेवाळे, प्रकाश आढाव, तानाजी भिलारे, गणपत भिलारे, वामन आढाव, दिनकर आढाव, विजय भिलारे, सुमन भिलारे, ताराबाई भिलारे, साहेबराव भिलारे, आत्माराम भिलारे, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news