Rain alert : राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांत जोरदार पाऊस | पुढारी

Rain alert : राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांत जोरदार पाऊस

मुंबई; पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. यामुळे खरीप पिके संकटात आहेत. पण आता हवामान विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. राज्यातील काही भागात येत्या ४, ५ दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता (Rain alert) हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर पश्चिम आणि लगतच्या पश्चिमेकडील बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे महाराष्ट्रातील काही भागांत पुढील ४-५ दिवस पावसाची (Rain alert) शक्यता आहे.

राज्यातील काही भागात ३० ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार आहे. रायगड, रत्नागिरी, पालघर तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेज अलर्ट जारी केला आहे.

मुंबईत ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. रायगडमध्येही ३० ऑगस्टपासून १ सप्टेंबरपर्यंत जोरदारी पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये उद्या २९ ऑगस्ट रोजी तर रत्नागिरीत २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस पडू शकतो.

धुळे आणि नंदूरबारमध्ये ३१ ऑगस्ट रोजी जोरदार पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी, नाशिकमध्ये ३१ ऑगस्ट रोजी मुसळधार आणि १ सप्टेंबर रोजी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

औरंगाबाद, जालना आणि परभणीत ३१ ऑगस्ट रोजी, तसेच हिंगोली आणि नांदेडमध्ये पुढील दोन-तीन दिवसांत जोरदार पाऊस पडू शकतो.

अमरावतीत ३० ते ३१ ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button