जळगाव : वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेला अन् अनर्थ झाला…ट्यूबवेलचा शॉक लागून मृत्यू | पुढारी

जळगाव : वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेला अन् अनर्थ झाला...ट्यूबवेलचा शॉक लागून मृत्यू

जळगाव : तालुक्यातील कुवारखेडा गावातील १९ वर्षीय तरुणाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त केला. ज्ञानेश्वर सुभाष पाटील (वय १९, कुवारखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे.

वडिलांना शेतात फवारणी करण्यास मदत करण्यासाठी ज्ञानेश्वर सुभाष पाटील हा तरुण शेतात आला असता फवारणीसाठी पाण्याची टाकी भरायची असल्याने तो शेतातील ट्युबवेल सुरू करण्यासाठी गेला. यावेळी वीज खांबावरील वीज प्रवाह (करंट) ट्यूबवेलमध्ये उतरल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शेतात काम करणार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी ज्ञानेश्वरला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी करीत त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button