नगर : अन्यथा बाह्यवळणचे काम बंद पाडू, मार्गालगतच्या शेतकर्‍यांनी मांडली कैफियत | पुढारी

नगर : अन्यथा बाह्यवळणचे काम बंद पाडू, मार्गालगतच्या शेतकर्‍यांनी मांडली कैफियत

नगर : पुढारी वृत्तसेवा : बाह्यवळण रस्त्यालागतचे सगळे सर्व्हिस रस्ते अंडर क्रॉस करा, अन्यथा येत्या पंधरा दिवसांत रस्त्याचे काम बंद पाडण्याचा इशारा जि. प. चे माजी सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे. कार्ले यांनी वाळुंज बाह्यवळण रस्त्यालगतच्या शेतकर्‍यांच्या, तसेच स्थनिक लोकांची कैफियत ऐकून घेतली. यावेळी ते बोलत होते. कार्ले म्हणाले की, नगर शहराच्या बाजूने राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्याचे काम चालू आहे. या बाह्यवळण रस्त्यावरून शंभरच्या वेगाने वाहने धावणे अपेक्षित आहे.

नगर शहराच्या दृष्टीने ती अभिमानाची व गरजेची गोष्ट आहे. परंतु हा रस्ता झाल्यानंतर हा रस्ता चार पदरी, सहा पदरी होणार आहे. यामध्ये दुभाजक असणार आहेत. परंतु ज्या ठिकाणी दुभाजक असून, हा रस्ता दुभाजक आलोंडायला दोन किलोमीटर किंवा एक किलोमीटरची अट टाकून त्याच ठिकाणी हे दुभाजक ओलांडण्यासाठी रस्ता देणार आहेत. येथील शेतकर्‍यांची रस्त्याच्या उजव्या व डाव्या अशी दोन्ही बाजूला जमीन आहे. रस्त्याची उंची 12 ते 15 फुटांपेक्षा जास्त आहे.

15 फूट उंची वाढल्यानंतर या लोकांना जनावरे, शेती करण्यासाठी ट्रॅक्टर, इतर शेती साहित्य आणी पाणी न्यायचे कसे, हा प्रश्नआहे. महिलांना पाण्याचा हंडा नेता येईल का? रस्ता चालू असताना राष्ट्रीय महामार्गावरून वाहने शंभरच्या वेगाने चालली पाहिजे अशी पाययोजना केली आहे. दोन्ही बाजूच्या शेतकर्‍यांना रस्त्यावर यायचं म्हटलं तर दूरवर जावे लागते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. स्थानिकांची ही समस्या राष्ट्रीय महामार्गच्या लोकांनी लक्षात घेतली नाही. बाह्यवळणचा स्थानिकांना फायदा होणार नाही. वृद्ध, जनावरे व लहान मुले हे बाह्यवळण रस्ता क्रॉस करून जाणार आहेत.

यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांना भेटून दोन्ही बाजूने सर्व्हिस रस्त्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जिथे 2 ते 5हजार लोकसंख्या आहे तिथे खालून रस्ता करू शकतो. गायकवाड वस्ती, कार्ले वस्ती, वाकोडी येथील मुले वाळुंजमध्ये शाळेला येतात. हे मुलं जाणार कशी ? रस्ता क्रॉसिंग करताना मुलांना अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या काम चालू आहे. महामार्गच्या अधिकार्‍यांनी अडचणी दूर कराव्यात, भवियात केंद्र सरकार किंवा महामार्गाचे अधिकारी कुणीही ऐकणार नाहीत, म्हणून त्यांनी कुठल्याही परिस्थितीत येत्या पंधरा दिवसांत समस्या मार्गी लावा,े लागेल, अशी मागणी कार्ले यांनी केली.

Back to top button