जळगाव : चिमुकलीवर अतिप्रसंग, आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास | पुढारी

जळगाव : चिमुकलीवर अतिप्रसंग, आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास

जळगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराप्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाने आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. जामनेर तालुक्यातील खेडे गावातील पाचवर्षीय चिमुकली आपल्या कुटुंबीयांसह राहाते. दि. 14 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही चिमुकली खेळत असताना भगवान शंकर कर्पे (50) याने मुलीला तंबाखूची पुडी घेण्यासाठी दुकानात पाठविले होते. ती तंबाखूची पुडी देण्यास गेली असता, आरोपी भगवान कर्पे याने तिचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.

याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत कर्पे याला अटक करण्यात आली होती. जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश डी. वाय. काळे यांच्या न्यायालयात हा खटला चालविण्यात आला. या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडितेसह तिच्या आजीची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने कर्पे याला 10 वर्षांचा सश्रम कारावास आणि 5 हजारांची दंड आणि दंड न भरल्यास 3 महिन्यांचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. पैरवी म्हणून गणेश नायकर यांनी सहकार्य केले.

हेही वाचा :

Back to top button