नाशिक : लग्नास नकार दिलेल्या तरुणीचे अपहरण करून विनयभंग | पुढारी

नाशिक : लग्नास नकार दिलेल्या तरुणीचे अपहरण करून विनयभंग

नाशिक : लग्नास नकार दिलेल्या तरुणीचा वारंवार पाठलाग करून अपहरण करून तिला मारहाण केल्याची घटना मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पीडितेने संशयिताविरोधात अपहरण, विनयभंग, मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयिताने रविवारी (दि.१७) रात्री लग्नाची मागणी करीत जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यानंतर तिला शहरातील विविध परिसरात फिरवून कारमध्ये मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button