Nashik : इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमधील गडकिल्ल्यांसह पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी | पुढारी

Nashik : इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमधील गडकिल्ल्यांसह पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी

इगतपुरी (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा :

वरुण राज्याच्या कृपेने जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुका हिरवाईने नटला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. अतिगर्दी तसेच संततधारेमुळे अपघाताच्या शक्यतेने, नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने, दुगारवाडी, हरिहरगड, भास्करगड, अंजनेरी, वाघेरा तसेच इगतपुरी तालुक्यातील भावली, त्रिंगलवाडी, कुरुंगवाडी आदी सर्व गडांवर आणि सर्व पर्यटनस्थळी आजपासून पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांना जाण्यास बंदी असणार आहे.

नाशिक शहर व सभोवतालच्या परिसरात काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना व पर्यटन प्रेमींना या ठिकाणांना भेट देण्याचा मोह होणे साहजिक आहे. परंतु या गडांवर किंवा पर्यटनस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न नागरीकांनी करु नये, अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा नाशिक पश्चिम भाग उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत नागरिकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन वनविभागने केले आहे.  इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत तंतोतंत पालन करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button