नाशिकच्या तेरा जणींनी अनुभवला हिमालय ट्रेकचा थरार | पुढारी

नाशिकच्या तेरा जणींनी अनुभवला हिमालय ट्रेकचा थरार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्स तसेच भोसला अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील 13 विद्यार्थिनींसाठी आयोजित केलेला हिमालय ट्रेक कडाक्याची थंडी, पाऊस आणि जोरदार वार्‍याचे आव्हान पेलत हिरारीने पूर्ण केला. अवघ्या पाच दिवसांत हा ट्रेक पूर्ण केला.

हिमालया ट्रेकच्या पहिल्या दिवशी विद्यार्थिनी हिमाचल प्रदेशातील हंप्तापासमधील वसिष्ठ ऋषी मंदिर, राम मंदिर व हिडिंबा देवीचे दर्शन घेऊन तेथील हवामानाशी जुळून घेण्यासाठी जोगनी वाटरफॉल येथे ट्रेक पूर्ण केला. दुसर्‍या दिवशी जोबरा येथून ट्रेकला सुरुवात करून साधारण 3-4 किलोमीटरवर असलेल्या चिकापर्यंत ट्रेक पूर्ण केला. त्यानंतर बालुकाघेरा, हंप्तापास, शियागुरू, छत्रू असा 23 किमीचा ट्रेक पूर्ण केला. पाच दिवस डोंगराळ भागात ऊन, वारा, पाऊस, थंडी तसेच बर्फाळ प्रदेशाचा विचार न करता विद्यार्थिनींनी हा ट्रेक पूर्ण केला.

या साहसी ट्रेकसाठी भोसला मिलिटरी गर्ल्स स्कूलचे समादेशक एम. एम. मसूर यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका साक्षी भालेराव यांनी विद्यार्थिनींना ट्रेकमध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन केले. भोसला अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशनचे संतोष जगताप यांनी हिमालय ट्रेकची माहिती दिली.

हेही वाचा :

Back to top button