कर्मवीर विद्यालयामुळे सांगवीच्या वैभवात भर; अनिल तावरे यांचे प्रतिपादन | पुढारी

कर्मवीर विद्यालयामुळे सांगवीच्या वैभवात भर; अनिल तावरे यांचे प्रतिपादन

सांगवी : पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील सांगवी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या इमारतीच्या 32 खोल्यांची रंगरंगोटी करण्यात आली आहे. या शाळेचे माजी विद्यार्थी उद्योजक भरत तावरे यांच्याकडून रंगरंगोटीसाठी 16 लाख रुपयांचे योगदान मिळाल्याने शाळेच्या वैभवात भर पडली असल्याचे प्रतिपादन माळेगाव कारखान्याचे संचालक व स्कूल कमिटी सदस्य अनिल तावरे यांनी केले. सांगवी येथील उद्योजक भरत रंगराव तावरे यांनी 1974 साली इयत्ता 11 वी सोडल्यानंतर मुंबई येथे रोहन-सोहन डायकेम कंपनीच्या माध्यमातून उत्तुंग भरारी घेतली.

प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतलेल्या इमारतीची रंगरंगोटी करून देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. त्याप्रमाणे शाळेच्या 32 खोल्यांसह स्वच्छतागृहांच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे. गुरुवारी ( दि.30 ) शाळा व्यवस्थापन समिती व उद्योजक भरत तावरे यांनी रंगरंगोटीची पाहणी केली, त्यावेळी अनिल तावरे बोलत होते. सरपंच चंद्रकांत तावरे, उपसरपंच अनिल काळे, पोपट तावरे, किरण तावरे, प्राचार्य अनिल धुमाळ, पर्यवेक्षक जयवंत सवाणे, गुरुकुल प्रमुख सुभाष लकडे आदी यावेळी उपस्थित होते.

 

 

 

 

Back to top button