धुळे : छळाला कंटाळून एकाची आत्महत्या ; सात जणांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

धुळे : छळाला कंटाळून एकाची आत्महत्या ; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा

घर दुरुस्तीच्या कारणावरून होत असलेली मारहाण आणि छळास कंटाळून एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना साक्रीत घडली. या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्री येथील भाडणे रोडवर राहणारे योगेश पंडित रामोळे (वय 43) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे पंडित एकनाथ रामोळे यांनी साक्री पोलीस ठाणे गाठून त्यांच्या मुलाने छळास कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती दिली. रामोळे यांच्या शेजारी राहणारे गणेश मोरे यांनी त्यांच्या घराच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. यावेळी मयत योगेश रामोळे यांनी भिंतीची दुरुस्ती करत असताना आपल्या घराची भिंत पडणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. मात्र या सल्याचा गणेश मोरे यांना राग आला होता. त्यामुळे गणेश मोरे सह रोहित ऊर्फ पिंटू मोरे आणि संदीप मोरे यांनी योगेश रामोळे यांना कामावरून घरी बोलावले. यानंतर त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झाल्यामुळे योगेश रामोळे हे बेशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेऊन घरी परत आल्यानंतर देखील धारया जोहरी ,गोपाळ जोहरी, कुंदन जोहरी आणि बापू एकनाथ रामोळे यांनी मयतास ते राहात असलेले घर खाली करून देण्यासाठी त्रास देणे सुरू केले. या सर्व त्रासाला कंटाळून योगेश रामोळे यांनी गळफास घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यानुसार या सर्व सात जणांच्या विरोधात भादवि कलम 306 ,323 ,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button