सांगली : ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर

सांगली : ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर

Published on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ येथे शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यांनी समर्थनार्थ घोषणा देऊन 'एकनाथ भाई परत या..' च्या घोषणा दिल्या.

येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात शहरप्रमुख महिंद्र चंडाळे, मयूर घोडके, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुजाता इंगळे, मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, माजी शहरप्रमुख अनिल शेटे, भगवानदास केंगार, अमोल कांबळे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती शिल्पाला हार घालून शिवसैनिकांनी घोषणा दिल्या. बिकट परिस्थिती आली तरी शिवसैनिक मागे हटणार नाही. आम्ही नव्या उत्साहाने या आव्हानाला सामोरे जाऊ. शिवसेनेचे आमदार कुठेही जाणार नाहीत, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news